Dahi Handi Shivsena Banner | ठाण्यात राजन विचारेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी – tv9

| Updated on: Aug 19, 2022 | 9:19 AM

खासदार राजन विचारे यांच्यामार्फत परिसरात मोठ्याप्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. येथे निष्ठेचे थोर अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आहे.

गोकुळ जन्माष्टमी किंवा दहीहंडीचा जल्लोष अवघ्या देशात पहायला मिळत आहे. यानिमित्तानेच आता ठाण्यात देखील महा दहीहंडीचा थरार हा आज पहायला मिळणार आहे. महा दहीहंडीसाठी अनेक गोविंदा तेथे पोहचत आहेत. तर अनेक शिवसैनिक देखिल तेथे दाखल होत आहेत. याच दरम्यान ठाणे आणि संपूर्ण परिसरामध्ये असं उत्साहाचा आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. दरम्यान खासदार राजन विचारे यांच्यामार्फत परिसरात मोठ्याप्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. येथे निष्ठेचे थोर अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच येथे सोबतच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांचे देखिल बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळे सध्या परिसरामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचे वातावरण आहे.

 

Published on: Aug 19, 2022 09:19 AM
Special Report | बोट भरकटली की दहशतवादी प्लॅन?
Shivsena Political Crisis | कोकणातील एक आमदार शिंदे गटात सामील होणार?-tv9