Krishna Janmashtami | देशभरात गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह-tv9
देशभरात यंदा गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मथुरेत जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तर मुंबईतील इस्कॉन मंदिरात देखील गोकुळाष्टमीचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
देशभरात यंदा गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोरोनाचे दोन वर्षे आणि त्यानंतर वेगवेगळ्या कारणाने गोकुळाष्टमी साजरी करण्यावर बंधणे आली होती. यावर्षी मात्र सर्व सुरळीत सुरू असल्याने गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. मथुरेत जन्माष्टमी मथुरावासिय मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. ते येथील कृष्ण मंदिरात पूजाअर्चा करत आहेत. तर राज्यात देखील गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह ओसांडून वाहताना दिसत असून ठिकठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम केला जात आहे. गोविंदा येथे आपली हजेरी लावताना दिसत आहेत. दरम्यान मुंबईतील इस्कॉन मंदिरात देखील गोकुळाष्टमीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तर तिकडे राजधानी दिल्लीत देखील जन्माष्टमी मोठ्या भक्ती भावाने केली जात आहे.
Published on: Aug 19, 2022 09:54 AM