Andheri Raja | अंधेरीच्या राजाला सोन्याचा मुकूट, विधिवत केली पूजा
Andheri Raja | अंधेरीच्या राजाला सोन्याचा मुकूट घालण्यात आला. यावेळी मंत्रोपच्चारात विधिवत पूजा ही करण्यात आली.
Andheri Raja | अंधेरीच्या राजाला (Andheri Raja )सोन्याचा मुकूट (Gold crown)घालण्यात आला. यावेळी मंत्रोपच्चारात विधिवत पूजा ही करण्यात आली. बुधवारी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) दुपारी मुहूर्तावर अंधेरीच्या राजाच्या मस्तकी मुकूट विराजमान झाला. मंडळाने यासाठी खास तयारी केली होती. भाविकांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून हा गणपती ओळखल्या जातो. मुंबईच नाहीतर राज्यातूनही भाविक भक्त अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी करतात. लालाबागच्या राजासारखाच अंधेरीच्या राजाचाही आगळावेगळा थाट आहे. नवस फेडण्यासाठी आणि नवस करण्यासाठी आजपासून भाविकभक्तांची रीघ लागली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच वरुणराजानेही जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात सर्वदूर पावसाने बाप्पाला जलाभिषेक केला. त्यामुळे दोन वर्षानंतर आपल्या भव्य रुपात पावणारा गणरायाने शुभ संकेत दिल्याची भावना भाविकांच्या मनी दाटून आली आहे.