Gold Hallmarking | आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक
आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Gold Jewellery Hallmarking Compulsory from today)
मुंबई: येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरंतर या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ही मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली. त्यानुसार आजपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होईल. (Gold Jewellery Hallmarking Compulsory from today )