दोन वर्षांआधी इमारत तयार झाली, पण आरोग्य केंद्राचं लोकर्पण रखडलं; आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
गोंदियातील चिखली आरोग्य केंद्राची इमारत मागच्या दोन वर्षांपासून तयार आहे. मात्र त्याचं लोकार्पण झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाहा...
गोंदिया : बातमी गोंदिया जिल्ह्यातून… गोंदियातील चिखली आरोग्य केंद्राचं लोकार्पण मागच्या दोन वर्षांपासून रखडलं आहे. चिखली आरोग्य केंद्राचे लोकार्पण कधी होणार? हाच प्रश्न वारंवार विचारला जात आहे.मागच्या दोन वर्षांपासून इमारत तयार आहे. मात्र त्याचं लोकार्पण झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. याबाबतचं कामकाज अद्याप नाही सुरुच झालेलं नाही. इमारतीच्या काचा आणि इतर वस्तूही आता खराब व्हायला सुरुवात झाली आहे. तयार झालेल्या इमारतीत अजूनपर्यंत कामकाज सुरू झाले नसल्यानं त्वरित आरोग्याच्या सुरु करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
Published on: Mar 08, 2023 08:30 AM