आले रे हत्ती आले…; कोणत्या जिल्ह्यात 20 ते 25 हत्ती, वनविभाग आला अलर्टमोडवर?
मागील वर्षी हत्तीच्या कळपांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची हानी करत अनेक ठिकाणी जीवितहानी सुद्धा केली होती. त्यानंतर हा कळप माघारी फिरला होता. आता मात्र हा पुन्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भासबोडण जंगलात आढळला आहे.
गोंदिया : मागील दोन वर्षांपासून गोंदिया गडचिरोलीमध्ये हत्तींचा मुक्त संचार बघायला मिळत आहे. या जिल्ह्यात अनेक वेळा हत्ती आणि मानसात संघर्ष पहायला मिळाला आहे. आता देखील गोंदियाकरांसाठी वनविभागाचा अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात 20 ते 25 हत्तींचा कळपाने दर्शन दिलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आहे. मागील वर्षी हत्तीच्या कळपांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची हानी करत अनेक ठिकाणी जीवितहानी सुद्धा केली होती. त्यानंतर हा कळप माघारी फिरला होता. आता मात्र हा पुन्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भासबोडण जंगलात आढळला आहे. ज्यात 20 ते 25 हत्तींचा समावेश आहे. हा कळप अर्जुनी मोरगावच्या जंगलाच्या दिशेने सायंकाळच्या सुमारास राणीडोह जंगलात दिसून आला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर आता हा कळप अर्जुनी मोरगावच्या जंगलातच तळ ठोकतो की गडचिरोलीच्या दिशेने जातो हे पाहने महत्त्वाचे ठरणार आहे. तर यावर वनविभाग नजर ठेवून आहे.