गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुणाचं वर्चस्व? ‘या’ दोन बड्या नेत्यांना मोठा धक्का
Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल; पाहा कोण झालं विजयी?
गोंदिया : गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल लागतोय. गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा विजय झाला आहे. 18 पैकी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या गटाचा विजय झालाय तर काँग्रेस 14 विजयी झाली आहे. गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळतंय. तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला एक जागा मिळाली आहे. गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी आणि भाजप यांना मोठा धक्का बसलाय. प्रफुल पटेल आणि माजी पालकमंत्री परिणय फुके यांना मोठा धक्का बसला आहे. तर या आधी काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता असून मात्र यावेळी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि काँग्रेससोबत हात मिळवून सत्ता स्थापना करणार आहेत.
Published on: Apr 29, 2023 03:03 PM