‘बरं झालं शिंदे गेले, असंगाशी संग तुटला’ उध्दव ठाकरे
भाजप संघाची विचारसरणी घेऊन पुढे जात आहेत का? त्यांची विचारसारणी भाजप मनात आहेत का? हे एकदा त्यांनीतपासून पाहावे अशी खोचक टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
मुंबई – बरं झालं शिंदे गेलॆ असंगाशी संगं तुटला असा घणाघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. संघाच्या विचाराप्रमाणे भाजप वागतेय का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे? आम्ही गेली 30-35 वर्षे हिंदुत्व एके हिंदुत्व (Hindutv)या स्वप्नापायी भाजपबरोबर युती केली होती . संघाबद्दल एका विचारधारा आहे. मात्र त्यांचा राजकीय पक्ष भाजप (BJP)संघाची विचारसरणी घेऊन पुढे जात आहेत का? त्यांची विचारसारणी भाजप मनात आहेत का? हे एकदा त्यांनीतपासून पाहावे अशी खोचक टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
Published on: Aug 26, 2022 06:22 PM