Gopichand Padalkar on Raut | तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नाहीच’ गोपीचंद पडाळकर यांनी हाणला टोला

| Updated on: Aug 01, 2022 | 4:46 PM

Gopichand Padalkar on Raut | तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नाहीच, अशी भूमिका घेऊन कसे चालेल? असा टोला भाजप नेते गोपीचंद पडाळकर यांनी हाणला.

Gopichand Padalkar on Raut | तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नाहीच, अशी भूमिका घेऊन कसे चालेल? असा टोला भाजप नेते गोपीचंद पडाळकर (Gopichand Padalkar) यांनी विरोधकांना ( opposition party) हाणला. महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी आपल्याला अनेक प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. अनेक खोट्या केसेस दाखल केल्या. त्यात न्यायालयाने जामीनही दिला. तुम्ही दाखल केलेल्या केसेस, प्रकरणात आम्ही आजही न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात आहोत. पण आता तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही तो मी नव्हेच अशी भूमिका घेता, यावर पाडळकर यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनीही आता न्यायालयीन प्रक्रियेला (Court Process) सामोरे गेले पाहिजे. नाहक चुकीचे आरोप करु नयेत असा चिमटा ही त्यांनी काढला. न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जा, तुमच्याकडील पुरावे द्या. तिथं दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, असं सांगायला ही पाडळकर विसरले नाहीत. संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Aditya Thackeray on Raut | कसले बंडखोर? हे तर गद्दार, बंडखोरीला हिंमत लागत असल्याचा सांगत आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
Ravi Rana on ED Inquiry | आता कुणालाही सोडलं जाणार नाही, संजय राऊत यांच्यावरील कारवाई योग्यच, रवी राणा यांचे सूचक वक्तव्य