Gopichand Padalkar : पवार कुटुंब सोडून कुणी मोठं झालेलं त्यांना पाहावत नाही, पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

| Updated on: Sep 04, 2022 | 3:01 PM

सत्तेवर आल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी चांगले निर्णय घेतले. अडीच महिने महत्त्वाचे निर्णय घेतले. अडीच वर्ष आघाडीचे नेते दिसले नाहीत. त्याच्यावर ताई बोलणार नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे लोकांसाठी दिवस-रात्र काम करत आहेत, असे पडळकर म्हणाले. 

मुंबई : सुप्रिया ताईंचे दुःख हे आहे की महाराष्ट्रामध्ये पवार कुटुंब सोडून कोणी मोठं नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. ते म्हणाले, की आपले वडील राज्याचे प्रमुख आहेत. सगळे निर्णय तेच घेतात, या सुप्रिया सुळे यांच्या विचाराला छेद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांनी दिला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना साथ दिली. एका स्ट्रांग माणसाला मुख्यमंत्री बनवलं हे दुखणं पवार कुटुंबीयांना आहे. आजितदादा (Ajit Pawar) पण फुटले होते. फक्त दोन आमदार त्यांच्यासोबत राहिले होते. यांच्यासोबत 50 आमदार आहेत. सत्तेवर आल्यानंतर यांनी चांगले निर्णय घेतले. अडीच महिने महत्त्वाचे निर्णय घेतले. अडीच वर्ष आघाडीचे नेते दिसले नाहीत. त्याच्यावर ताई बोलणार नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे लोकांसाठी दिवस-रात्र काम करत आहेत, असे पडळकर म्हणाले.
Published on: Sep 04, 2022 03:01 PM
Shrikant Shinde : ‘ट्रेलर’नेच धडकी भरली?… पिक्चर अभी बाकी है’!!! श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांना डिवचलं
Neelam Gorhe : कोण कुठल्या भाषेत बोलतं, यापेक्षाही जनादेश महत्त्वाचा; नीलम गोऱ्हेंचा आशिष शेलारांना टोला