Video : आज कुणीही पावसात भिजलं तरी काहीही उपयोग नाही, मविआ निवडणूक हरणारच- गोपीचंद पडळकर

| Updated on: Jun 20, 2022 | 1:39 PM

मुंबई : आज विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council Election) होतेय. अश्यात दोन्ही बाजूने जिंकण्याचा दावा केला जात आहे. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मोठा दावा केलाय. काहीही झालं तरी महाविकास आघाडी विधान परिषद निवडणूक जिंकणार नाही. कुणी पावसात भिजलं तरी काहीही उपयोग होणार नाही, असं पडळकर म्हणाले आहेत. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद […]

मुंबई : आज विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council Election) होतेय. अश्यात दोन्ही बाजूने जिंकण्याचा दावा केला जात आहे. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मोठा दावा केलाय. काहीही झालं तरी महाविकास आघाडी विधान परिषद निवडणूक जिंकणार नाही. कुणी पावसात भिजलं तरी काहीही उपयोग होणार नाही, असं पडळकर म्हणाले आहेत. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्यावेळी पाऊस पडला अन् ती निवडणूक राष्ट्रवादीने जिंकली. उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला तर पवारांचे स्नेही श्रीनिवास पाटील यांनी ही विजय खेचून आणला. सध्या पावसाळा सुरू आहे. मुंबईत धोधो पाऊस कोसळतोय. विधान परिषदेची निवडणूक होतेय. पण आज कुणीही पावसात भिजलं तरी विजय भाजपचाच होणार, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Published on: Jun 20, 2022 01:36 PM
Video : शिवसेनेचा एक उमेदवार पडणार, भाजपचे सर्व उमेदवार जिंकणार, रवी राणा यांचा दावा
धनंजय मुंडे-चंद्रशेखर बावनकुळेंची गळाभेट; व्हिडीओ चर्चेत