शरद पवार आणि संजय राऊत म्हणजे चलनातून बाद झालेल्या फाटक्या नोटा; कुणाचा घणाघात
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा...
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या, जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनातून बाद झालेल्या नोटा आहेत”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. “शिंदे-फडणवीस सरकार स्ट्राँग आहे. कुणीही चिंता करण्याचं कारण नाही. जे कुणी सरकारवर टीका करत आहे. त्यांना त्यांच्याजवळची माणसं टिकवण्यासाठी बोलावं लागेल. भाजपमधील प्रत्येक नेता पक्षाच्या विचारांवर चालतो. आम्ही काय पवारांच्या टोळीतील माणसं नाहीत. पळून जायला. सरकार स्टाँग आहे.कुणीही चिंता करू नये”, असंही पडळकर म्हणालेत.
Published on: Feb 16, 2023 10:28 AM