“हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा, पण त्यांनी राजकारण करण्याची गरज नव्हती”, गोपीचंद पडळकरांच्या निशाण्यावर कोण?
गोपीचंद पडळकर यांची राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार टीका केली आहे. गेल्यावर्षी गोपीचंद पडळकर यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येऊ दिलं नव्हतं. त्यांना गेटवरच अडवलं होतं आणि आता रोहित पवार यांनी स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत.
अहमदनगर : गोपीचंद पडळकर यांची राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार टीका केली आहे. गेल्यावर्षी गोपीचंद पडळकर यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येऊ दिलं नव्हतं. त्यांना गेटवरच अडवलं होतं आणि आता रोहित पवार यांनी स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. यावर गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. दिवस कधीच सारखे नसतात. आजचा दिवस हा आनंदाचा, उत्साहाचा आहे. देशभरातून अहिल्यादेवी होळकरांचे अभिवादन करण्यासाठी आज चौंडी येथे लोक आले आहेत.यावर्षी खूप चांगलं वातावरण चौंडी आहे. हा जयंतीचा कार्यक्रम आहे, इथे राजकारण करण्याची आवश्यकता नव्हती, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
Published on: Jun 01, 2023 09:34 AM