नीलम गोऱ्हे यांच्या नाराजीवर सुषमा अंधारे यांचा निशाणा; म्हणाल्या, ‘आरोग्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा… ’
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावरून शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे. याचदरम्यान गोऱ्हे यांनी ठाकरे गट सोडण्यामागे कारणे सांगताना अप्रत्यक्ष सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटून आता एक वर्ष होत आहे. यादरम्यान ठाकरे यांच्या शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करमाऱ्यांचा रेटा कमी झालेला नाही. आताही विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावरून शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे. याचदरम्यान गोऱ्हे यांनी ठाकरे गट सोडण्यामागे कारणे सांगताना अप्रत्यक्ष सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. तर आपण सटरफटर लोकांवर आपण बोलत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावरून अंधारे यांनी पलवार करताना, गोऱ्हे यांना सुनावलं आहे. यावेळी त्यांनी, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी लढणारी मी एक सामान्य शिवसैनिक आहे. पण यांच्या भाषेत सटरफटर आहे. पण असो… ताई तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही सटरफटर लोकांकडे लक्ष देत नाही, हे चांगलं आहे. तुम्हाला भावी आरोग्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा असेही त्यांनी म्हटलं आहे. तर बुलढाण्यामध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यानंतर गोऱ्हे यांनी कोणत्याही पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली नाही. त्यामुळे त्यांचे मन शिंदे यांच्या शिवसेनेत कधीच गेलं होतं. आज फक्त प्रवेश झाला. तर मागिल सहा महिन्यांपासून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर आमच्या शिवसैनिकाचं लक्ष होतं असही त्या म्हणाल्या.