Pune : साधूंना झालेल्या मारहाणप्रकरणी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार, गोसावी समाजाची भूमिका
जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून साधूंची सर्व माहिती तपासून त्यांची सुटका केली. मूळच्या उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) असलेल्या या चौघा साधूंना मारहाण केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुणे : सांगलीतील जतमध्ये सांधूंना झालेल्या मारहाणीचा गोसावी (Gosavi) समाजाने निषेध केला आहे. मुले पळवण्यासाठी आलेली टोळी समजून सांगली जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ज्या चार साधूंना मारहाण झाली, त्या घटनेचा निषेध पुण्यात गोसावी समाजाच्या वतीने नोंदवण्यात आला आहे. या प्रकारचा घटना वारंवार घडतात, याला आळा बसावा, अशी मागणी या समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) गोसावी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती गोसावी समाजातर्फे देण्यात आली आहे. जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून साधूंची सर्व माहिती तपासून त्यांची सुटका केली. मूळच्या उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) असलेल्या या चौघा साधूंना मारहाण केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.