Chandrakant Patil : अजित पवार यांनी एसटी संपाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
सकारात्मक मार्ग काढला पाहिजे. विलीनिकरण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा असतात. चांगल्या पगारवाढीचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडे नेला तर कर्मचारी नक्की एक पाऊल मागे जातील. असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर अजित पवार यांनी एसटी संपाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असंही पाटील यावेळी म्हणालेत.
एसटी (ST) कर्मचाऱ्यांचा संप मिटला नाही तर एक लाख कुटुंब उद्ध्वस्त होतील. सातवा वेतन आयोग देण्याबाबत काही उपया निघाला पाहिजे. ग्रामीण भागात लोकांचे हाल होत आहेत. चार महिने संप सुरू आहे. यावर सकारात्मक मार्ग काढला पाहिजे. विलीनिकरण म्हणजे सरकारी (Goverment) कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा असतात. चांगल्या पगारवाढीचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडे नेला तर कर्मचारी नक्की एक पाऊल मागे जातील, असं चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले. तर अजित पवार यांनी एसटी संपाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असंही पाटील यावेळी म्हणालेत.
Published on: Mar 22, 2022 09:03 PM