सरकारी कर्मचाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेऊ नये : मुख्यमंत्री शिंदे
या संपामुळे शिक्षण आणि सरकारी कामकाजावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.
मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आक्रमक झाला आहे. जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यत संप हा सुरूच राहणार अशीही भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. या संपाचा थेट परिणाम आता समोर येत असून एकट्या नागपूरमध्ये नागपूर मेडीकलमध्ये तीन दिवसात 40 मृत्यूची नोंद झाली आहे. तर या संपामुळे शिक्षण आणि सरकारी कामकाजावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. याचबाबत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. याच्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच हा प्रश्न चर्चेतून सुटू शकतो. चर्चा न करता कुठलाही निर्णय हा योग्य ठरत नाही. या प्रश्नावर एवढी तातडी नव्हती. यावर जो निर्णय होईल. जे सुत्र तयार करण्यात येईत त्यात आता जे रिटायर होणार आहेत त्यांच्याही विचार केला जाणार आहे.