Bhagat Singh Koshyari : वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांची माफी, कोश्यारी म्हणाले, माझी चूक झाली
मराठी भाषेचा गौरव वाढविण्याचा कसोसीनं प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशी माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर राज्यातील जनता मला माफ करेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला.
मुंबई : मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी अखेर माफी मागितली. यासाठी त्यांनी एक निवेदन दिले. निवदेनामध्ये 25 जुलै रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाजबांधवांचं कौतुक करताना माझ्याकडून काही चूक झाली. मुंबईच्या विकासात सर्वांचेच मोठे योगदान आहे. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली परंपरा आहे. यामुळंच आज आपला देश अग्रेसर आहे. गेल्या तीन वर्षात राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. मराठी भाषेचा गौरव वाढविण्याचा कसोसीनं प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशी माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर राज्यातील जनता मला माफ करेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला. राज्यात संतांची परंपरा आहे. ते मला माफ करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Published on: Aug 01, 2022 08:17 PM