राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध वाढला; ठाकरेगटापाठोपाठ ‘ही’ संघटनाही आक्रमक
ठाकरेगटापाठोपाठ आता सर्वपक्षीय कृती समितीनेही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्याला विरोध केलाय.
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 16 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. 16 फेब्रुवारीला होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निमंत्रित करण्यात आलंय. त्यांच्या या दौऱ्याला विरोध केला जातोय. या दौऱ्याविरोधात काल शिवसेनेच्या ठाकरे गटाने आंदोलन केलं. ठाकरेगटापाठोपाठ आता सर्वपक्षीय कृती समितीनेही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्याला विरोध केलाय. सर्वपक्षीय कृती समिती उद्या कुलगुरूंना याविषयी जाब विचारणार आहे. राज्यपाल दीक्षांत समारंभाला आल्यास 16 फेब्रुवारीला गुरुवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.
Published on: Feb 12, 2023 09:05 AM