Satyajit Tambe On CM | राज्य सरकारने गोविदांना सरकारी नोकरी आरक्षणावर सत्यजीत तांबेंचे वक्तव्य – tv9

| Updated on: Aug 20, 2022 | 11:44 AM

गोविंदांना देण्यात येणाऱ्या नोकरीच्या आरक्षणावरून काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी देखील टीका केलेली आहे. गोविंदांना सरकारी नोकरीत थेट आरक्षण देणं, म्हणजे राज्यातील बेरोजगारांची खट्टा असल्याचे तांबे यांनी म्हटलं आहे.

राज्यात गोविंदांना देण्यात येणाऱ्या नोकरीच्या आरक्षणावरून आता राजकारण चांगलंच पेटल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी देखील यावर टीका केलेली आहे. यावर तांबे म्हणाले, दहीहंडीचा साहसी खेळामध्ये समावेश करण्यावर विरोधाचे कोणतेही कारण नाही. पण गोविंदांना सरकारी नोकरीत थेट आरक्षण देणं, म्हणजे राज्यातील बेरोजगारांची खट्टा असल्याचे तांबे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर नोकर भरतीवरून निशाणा साधताना तांबे म्हणाले, 2014 पासून 2019 पर्यंत मागील सरकारांनी आणि दुर्दैवीने महाविकास आघाडी सरकारने देखील आणि आता या सरकारनेही नोकर भरती केलेली नाही. आणि आता यातच अशा पद्धतीने निर्णय घेऊन राज्यातील तरुणांची चेष्टा करण्याचं काम हे शिंदे सरकार करत आहे.

 

Ajit Pawar यांचा गोविंदांच्या नोकरीवरुन राज्य सरकारला सवाल-tv9
5 % Reservation for Govinda | गोविंदांच्या नोकरीतील आरक्षणावरुन MPSC विद्यार्थी संतप्त-tv9