ग्रामपंचायत निवडणूक निकाल; शिंदे गटाला शिवसेनेपेक्षा अधिक जागा; जाणून घ्या आतापर्यंतच्या निकालात कोणाची बाजी?
आज राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
मुंबई : आज राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर सर्वात कमी ग्रामपंचायती शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपाने 37 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी 19 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. शिंदे गटाने 5 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. तर सर्वात कमी म्हणजे 4 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा विजय झाला आहे. तर इतर पक्ष आणि आघाड्यांचा 10 ग्रामपंचायतींमध्ये विजय झालाय.
Published on: Sep 19, 2022 11:16 AM