राजकीय वर्तुळात मोठी खळबळ; थेट 200 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द; नेमकं कारण काय?
राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र 12 महिन्याच्या मुदतीनंतरही सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्ह्यातील 200 ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.
परभणी : परभणी जिल्ह्यात 2021 मध्ये एकूण 556 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यावेळी राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र 12 महिन्याच्या मुदतीनंतरही सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्ह्यातील 200 ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. याबाबच जिल्हाधिकारी आँचल गोयल यांनी जिल्हाभरातील 200 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे सांगितलं आहे. तसेच 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढणाऱ्या दोनशे सदस्यांनी विहित मुदतीत जातीचा दाखला दाखल केला नसल्यानेच जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये खळबळ माजली असून, रिक्त 200 जागावर पोटनिवडणूक होते का हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.