रेल्वेतून उतरले…6 महिन्याचं बाळ हातून निसटलं, आजोबांनी सांगितला घटनाक्रम

| Updated on: Jul 20, 2023 | 11:16 AM

ठाकुर्ली आणि कल्याण स्थानका दरम्यान हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एक सहा महिन्याची नात आपल्या आजोबाच्या हातातून निसटून नाळ्यात पडली. दरम्यान संबंधित घटनाक्रम कसा घडला याबाबत आजोबांनी माहिती दिली आहे.

मुंबई, 20 जुलै 2023 | लोकल तब्बल तीन तास जागेवर उभी राहिल्यामुळे आजारी असलेल्या सहा महिन्याच्या बाळाला हवेत बरं वाटावं यासाठी बाळाची आई आणि तिचे आजोबा लोकलमधून खाली उतरले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकाच्या दरम्यान इतर प्रवाशांसारखे आपल्या सहा महिन्याच्या बाळाला रेनकोटमध्ये गुंडाळुन घेऊन जात असताना आधी बाळाच्या आईचा पाय घसरला, त्यामुळे आपल्या मुलीला सावरायला गेलेल्या बापाला आपल्या हातात असलेली सहा महिन्याची नात रेनकोटमधून कधी नाल्यात पडली हे समजलेच नाही. बाळ नाल्यात पडल्यानंतर लोकांनी बाळ पडल्याचा आरडाओरड केल्यानंतर बाळ पडल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत हे सहा महिन्याचे बाळ नाल्यात वाहून गेले होते. बाळ नाल्यात वाहून गेल्याचा धक्का पचवू न शकलेल्या आईने आपल्या बाळासाठी जागेवरच हंबरडा फोडला. वाडिया हॉस्पिटलमध्ये या बाळाची ट्रीटमेंट सुरु होती. वाडीया मधून कल्याणला आपल्या घरी जाताना काळाने या बाळावर घाला घातला. ज्यांच्या हातातून आपली नात पडली त्या आजोबांनीच ही हृदयद्रावक घटना सांगितली

Published on: Jul 20, 2023 11:16 AM
‘दोन्ही घरांची सगळीचं माणसं गेली’, काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
Raigad Irshalwadi Landslide | इर्शादवाडीवर कालची रात्र ठरली काळरात्र, एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं, पहा मन सून्न करणारा हा व्हिडिओ