Wardha | वर्ध्यात द्राक्षाने भरलेल्या ट्रकला अपघात, रस्त्यावर द्राक्षांचा राडा

| Updated on: Feb 13, 2022 | 4:41 PM

वर्ध्यात ओव्हरटेक (Overtake) करण्याच्या नादात भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) ट्रकचालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला.

वर्ध्यात ओव्हरटेक (Overtake) करण्याच्या नादात भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) ट्रकचालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात पुलगाव येथून 13 कि.मी. अंतरावर असलेल्या केळापूरजवळ 12 फेब्रुवारी रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास झाला. रवी भास्कर जाधव (26, रा. मेहेकर, जि. बुलडाणा) असे मृतकाचे नाव असून क्लिनर प्रकाश सुखदेव लष्कर हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतक रवी भास्कर जाधव हा ट्रकमध्ये द्राक्ष भरून नागपूरकडे भरधाव जात होता. दरम्यान समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असतानाच नागपूरकडून पुलगावकडे जाणाऱ्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात रवी भास्कर जाधव याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश लष्कर हा गंभीर जखमी झाला.
VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 13 February 2022
Aaditya Thackeray | ‘पर्यावरण वाचवून शाश्वत विकास होत असेल, तर मी त्या बाजूने’