“बांगर हमारो” नवरदेवानेच गायलं संतोष बांगर यांच्यासाठी गाणं!
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर नेहमी आपल्या अॅक्शन आणि वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात.कधी पोलीस कर्मचाऱ्यासा शिवीगाळ तर कधी शिपायाला काणशीलात मारणं, अशा गोष्टींमुळे बांगर नेहमीच चर्चेत येत असतात. मात्र आता तर चक्क एका लग्न समारंभात संतोष बांगर यांच्यासाठी नवरदेवाने गाणं गायलं आहे.
हिंगोली : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर नेहमी आपल्या अॅक्शन आणि वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात.कधी पोलीस कर्मचाऱ्यासा शिवीगाळ तर कधी शिपायाला काणशीलात मारणं, अशा गोष्टींमुळे बांगर नेहमीच चर्चेत येत असतात. मात्र आता तर चक्क एका लग्न समारंभात संतोष बांगर यांच्यासाठी नवरदेवाने गाणं गायलं आहे. नवरदेवाने गाणं गायलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. कळमनुरीतील लग्नामधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “बांगर हमारो”, असं या गाण्याचं नाव आहे.
Published on: Jun 08, 2023 05:13 PM