ठाकरेंना षडयंत्र करायची जणू सवय…; संदीप देशपांडे यांची टीका

| Updated on: Mar 24, 2023 | 9:02 AM

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. यावेळी देशपांडे यांनी, ठाकरे यांना षडयंत्र करायची जणू सवय जडलेली आहे असं म्हटलं आहे

मुंबई : गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना निशाना करत टीका केली होती. त्यावर गेल्या 18 वर्षांपासून एकच रेकॉर्डिंग सुरु असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली होती. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. यावेळी देशपांडे यांनी, ठाकरे यांना षडयंत्र करायची जणू सवय जडलेली आहे. ठाकरे यांनी राज ठाकरेंविरोधात चढयंत्र केलं. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात केला. तर नारायण राणे, भाजप, मतदार यांच्या पाठीत खंजीर खुपसला. खंजीर खुपसायची तुम्हाला सवय झालेली आहे तुमचा तो स्थायी भाव आहे असा हल्ला देशपांडे यांची ठाकरे यांच्यावर चढवला.

Published on: Mar 24, 2023 09:02 AM
शिक्षेवरुन काँग्रेस आक्रमक, भाजपची आंदोलनाची हाक; राहुल गांधी शिक्षा प्रकरण तापणार
राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारल्याने विधानसभा अध्यक्षांचे खडेबोल, राहुल नार्वेकर यांनी दिला इशारा