बुलढाण्यावरून रविकांत तुपकरांचा राजू शेट्टींना इशारा; म्हणाले, आम्ही तयार आहोत
स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी, बुलढाणा राजू शेट्टी यांच्या मनात आहे का नाही हे माहित नाही? परंतु आम्ही लढण्यासाठी पूर्ण तयार आहोत असे म्हटलं आहे.
बुलढाणा : गुढीपाडव्याचा मुहूर्तावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठी राजकीय घोषणा केली. त्यांनी हातकणंगले सह पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार असल्याची सांगितल्याने. लोकसभा निवडणुकांच्या आधीच राज्यात चर्चेची राळ उडाली आहे. यावर बुलढाण्यातून आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नव्याच चर्चांना उत येत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी राज्यातील हातकणंगले, सांगली व कोल्हापूरसह पाच लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं घोषणा केली. यावेळी त्यांनी इतर दोन कुठले जिल्हे किंवा मतदारसंघ आहेत..? याचा मात्र उल्लेख केला नाही. किंवा बुलढाण्याबाबत कोणतीच घोषणा केली नाही. यावरून स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी, बुलढाणा राजू शेट्टी यांच्या मनात आहे का नाही हे माहित नाही? परंतु आम्ही लढण्यासाठी पूर्ण तयार आहोत. बुलढाण्यातून आम्ही पूर्ण ताकदीने येणारी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.