राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा, सुरत कोर्टाचा निर्णय; ‘त्या’ वक्तव्यामुळे अडचणी वाढल्या
Surat Sessions Court decision on Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षेचा निर्णय दिला आहे. पाहा...
सुरत, गुजरात : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावणी आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना जामीनही मंजूर झाला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. 2019 मध्ये निवडणुकी वेळी राहुल गांधी यांनी मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सगळ्या चोरांचं नाव हे मोदीच का असतं?, असं राहुल गांधी म्हणाले होते. या प्रकरणी आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्य विरोधात भाजप नेते पूर्णश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी राहुल गांधी यांना आज दोषी ठरवण्यात आलं आहे. चार वर्षांनंतर सुरत सत्र न्यायालयाने आज निकाल दिला आहे.
Published on: Mar 23, 2023 11:57 AM