पिक्चर लागून सात महिने झाले, तरी तेच तुनतुनं वाजवताहेत, आता बोअर झालंय; शिंदेगटातील मंत्र्याचं आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यासह त्यांनी ठाकरेगटाला सल्लाही दिला आहे. पाहा ते काय म्हणालेत...
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.”पिक्चर लागून सात महिने झाल्यानंतर त्याला महत्त्व नसतं. गद्दार गद्दार हे ऐकून लोकही आता बोअर झाले आहेत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. तुम्हाला काय मिळालंय, नाही मिळालंय, लोकांनी काय गद्दारी केली हे आता सगळं संपलंय. त्यांनी आता नवीन उभारीने पक्ष बांधला पाहिजे आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी निवडणुकीला आणि निवडून यायला महत्त्व आहे. तुम्ही तुमचे लोक निवडून आणा, आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करू, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.