“दसरा मेळावा आमच्यासाठी आजचा नाही, गेली 35 वर्षे आम्ही साजरा करतोय”

| Updated on: Sep 30, 2022 | 11:48 AM

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय, पाहा...

अनिल केऱ्हाळे, TV9 मराठी, प्रतिनिधी, जळगाव : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय. दसरा मेळावा हा काही आमच्यासाठी आजचा सण नाही. मागच्या 35 वर्षांपासून आम्ही दसरा मेळावा (Dasara Melava) साजरा करतोय, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. दसरा मेळाव्यासाठी नियोजन सुरू आहे. आढावा बैठका घेतल्या जात आहेत. किती कार्यकर्ते मुंबईला जातील. याची चाचपणी सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातून सुमारे 10 हजार कार्यकर्ते दसरा मेळाव्याला जातील. असा अंदाज आहे, असंही ते म्हणाले आहेत.

Published on: Sep 30, 2022 11:39 AM
साताऱ्यातील केळघर घाटात दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद
विश्व हिंदू परिषदेचे सदस्य राज ठाकरेंच्या भेटीला, पाहा व्हीडिओ…