“पक्ष वाढवायचा असेल, म्हणून केसीआर लोकं घेतायेत”, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 27, 2023 | 10:24 AM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळासह केसीआर राव पंढरपुरात आले आहेत. केसीआर आज महाराष्ट्रात असल्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही पक्षप्रवेशही या दौऱ्यात होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव: भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळासह केसीआर राव पंढरपुरात आले आहेत. केसीआर आज महाराष्ट्रात असल्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही पक्षप्रवेशही या दौऱ्यात होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाला कोणत्याही राज्यात पक्ष विस्तार करण्याचा अधिकार आहे. भारत राष्ट्र समिती पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांना पक्ष संघटन वाढवायचं असेल तर त्यांना लोकांना आपल्या पक्षात घ्यावंच लागेल. भारत राष्ट्र समिती पक्षामुळे सत्ताधाऱ्यांना फायदा होईल, असं वाटत नाही.”

 

Published on: Jun 27, 2023 10:24 AM
“…तर प्रकाश आंबेडकर तुमचे बाप आहेत का?” इम्तियाज जलील यांचं देवेंद्र फडणवीस यांना सवाल
“दौरा करण्यापेक्षा घरात बसून कुणाला मुख्यमंत्री करायचं ठरवा”, भाजप खासदाराचा राष्ट्रवादीवर निशाणा