मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब का? गुलाबराव पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं, “3 पक्षाचा संसार…”
मंत्रिमंडळ विस्तार आज होईल, उद्या होईल असं करत एक वर्ष सरलं तरी विस्तार अद्याप झालेला नाही. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने कोणाला कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार आज होईल, उद्या होईल असं करत एक वर्ष सरलं तरी विस्तार अद्याप झालेला नाही. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने कोणाला कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कुठेही घोडं अडलं नाही, घोडं सरळ चालत आहे. तीन वाटेकरी असल्याने संसारासारखंच आहे. तीन पक्षाचा संसार असल्याने थोडा वेळ लागत आहे.निश्चितपणे एक दोन दिवसांत विस्तार होईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.”
Published on: Jul 13, 2023 09:26 AM