नागालँडमधील विजयाने शरद पवार आनंदी असतीलही पण महाराष्ट्रात असाच निकाल लागणार नाही; कुणाचं टीकास्त्र?

| Updated on: Mar 05, 2023 | 8:21 AM

Gulabrao Patil on Sharad Pawar : नागालँड निवडणुकीच्या निकालावरून राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. पाहा...

जळगाव : शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी नागालँड निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ दिला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांचा विजय होणं ही शरद पवार यांच्यासाठी आनंदाची बाब असेल. तो दिवस पवारांसाठी आनंदाचा दिवस असेल. मात्र प्रत्येक राज्याची राजकीय गणितं वेगळी असतात. त्यामुळे नागालँडमध्ये हा निकाल लागला म्हणून महाराष्ट्रात लागेल असं होत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. ते जळगावमध्ये बोलत होते.

Published on: Mar 05, 2023 08:19 AM
माझ्या नादी काय लागता? मी संजय राऊतलाही घाम फोडतो; मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य
सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतलं; शिवसेनेच्या नेत्याचा आरोप