ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील -गुलाबराव पाटील
पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी आरक्षण प्रश्नी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी मागच्या सरकारने व याही सरकारने विरोध केलेला नाही. ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी मागच्या सरकारनेही प्रयत्न केले आणि याही सरकारने प्रयत्न केले. पुढील काळातही सगळ्या समाजातल्या शोषित पीडित घटकाला आरक्षण मिळण्यासाठी सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी सरकारच्या मागे उभे राहून […]
पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी आरक्षण प्रश्नी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी मागच्या सरकारने व याही सरकारने विरोध केलेला नाही. ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी मागच्या सरकारनेही प्रयत्न केले आणि याही सरकारने प्रयत्न केले. पुढील काळातही सगळ्या समाजातल्या शोषित पीडित घटकाला आरक्षण मिळण्यासाठी सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी सरकारच्या मागे उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय उभे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून त्यानुसार जळगावात मध्यवर्ती कार्यालय लवकरात लवकर सुरू करावे यासाठी आमदार लता सोनवणे यांचे पती चंद्रकांत सोनवणे व माझ्यावर कार्यालय सुरू करण्याची जबाबदारी आहे. त्या प्रमाणे मध्यवर्ती कार्यालयासाठी जागा शोधली जात असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.