500 चा दंड; गुलाबराव पाटील म्हणतात, ‘माफी मागण न मागणं हा इगोचा विषय’; नेमका काय आहे विषय?
हा वाद आता थेट इगोचा विषय झाला आहे. तर जळगाव न्यायालयात सुनावणीला दोघही गैरहजर राहिल्यामुळे त्यांना कोर्टानं पाचशे रुपये दंड केला. त्यावरूनही आता वार पलटवार होताना दिसत आहेत. तर यावरून गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना उपरोधात्मक टोला लगावला आहे.
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यात वाद चांगलाच वाढला आहे. हा वाद आता थेट इगोचा विषय झाला आहे. तर जळगाव न्यायालयात सुनावणीला दोघही गैरहजर राहिल्यामुळे त्यांना कोर्टानं पाचशे रुपये दंड केला. त्यावरूनही आता वार पलटवार होताना दिसत आहेत. तर यावरून गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना उपरोधात्मक टोला लगावला आहे. तसेच माफी हवी असेल तर खडसेंनी माझ्याकडे चहापाण्याला यावं, असं म्हटलं आहे. तर 2016 महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ खडसे मंत्री होते. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावरून खडसे यांनी जळगाव न्यायालयात धाव घेत पाटील यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता.
Published on: Jun 22, 2023 05:04 PM