VIDEO | गुलाबराव पाटील यांची डरकाळी; का म्हणाले? ‘मी स्वस्थ बसणार नाही’, कोणाला इशारा?
ठाकरे गटासह मविआच्या नेत्यांवर निशाना साधत मी गप्प बसणार नाही, मग शिंदे गटातील 40 आमदारांचे काहीपण होवो असं ते म्हणाले. त्यामुळे उपस्थितांसह अनेकांना काय झालं ते कळतच नव्हतं.
जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भर सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरे गटासह मविआच्या नेत्यांवर निशाना साधत मी गप्प बसणार नाही, मग शिंदे गटातील 40 आमदारांचे काहीपण होवो असं ते म्हणाले. त्यामुळे उपस्थितांसह अनेकांना काय झालं ते कळतच नव्हतं. यावेळी विरोधक म्हणतात, शिंदे गटाचे 40 आमदारांचे काहीपण होवो. पंरतु मंत्री गुलाबराव पाटलांना पराभूत करायचं आहे, पण माझं आव्हान आहे महाराष्ट्राचं काहीही होवो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात मी निवडून दाखवणारच. असं विधान गुलाबराव पाटील यांनी केले. मला पराभूत करण्यासाठी अनेकांनी चंग बांधला आहे. परंतु, महाराष्ट्राचे काहीही होऊ द्या मात्र जळगाव ग्रामीण मतदारसंघात भगवा फडकविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी डरकाळी गुलाबराव पाटील यांनी फोडलीय. मला चहू बाजूनं घेरणं सुरू आहे. माझी गत महाभारतातल्या अभिमन्यू सारखी केली जातेय. परंतु मतदारसंघात काम करताना प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होतो असेही गुलाबराव पाटील म्हणाले. 5 जून रोजी गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी घेतलेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते.