बुरा ना मानो होली है म्हणत, शिंदे गटाच्या मंत्र्याच्या ठाकरे यांना अनोख्या शुभेच्छा
गुलाबराव पाटील यांनी होळीनिमित्त या होळीत मागच्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत. सगळं विसरायचं आहेत. त्यामुळे बुरा ना मानो होली है अशा शुभेच्छा त्यांनी आपल्या मित्रांना आणि विरोधकांना ही दिल्या.
जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच “ही ढेकूण चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल,” असं म्हटलं होतं. त्यानंतर शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांनी त्याला उत्तर दिलं. तर गुलाबराव पाटील यांनी उत्तर देताना आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणार आहोत असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी आता होळी सण येत आहे. या होळीत मागच्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत. सगळं विसरायचं आहेत. त्यामुळे बुरा ना मानो होली है अशा शुभेच्छा त्यांनी आपल्या मित्रांना आणि विरोधकांना ही दिल्या.
Published on: Mar 06, 2023 05:24 PM