…तर ST कर्मचाऱ्यांच्या नुकसानाची जबाबदारी Gunaratna Sadavarte यांची असेल – Anil Parab
एसटी कामगारांना (msrtc) येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कामगार कोर्टाने (court) दिलेल्या मुदतीत कामावर आले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, असं कोर्टाने आम्हाला सांगितलं आहे.
एसटी कामगारांना (msrtc) येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कामगार कोर्टाने (court) दिलेल्या मुदतीत कामावर आले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, असं कोर्टाने आम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कामगार आले नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. कामगार आले नाही तर त्यांना नोकरीची गरज नाही, असं आम्ही समजू. कामगारांना निलंबित करणं, बडतर्फ करणं आणि नंतर त्यांची सेवा समाप्त करणं ही कारवाई आतापर्यंत केली आहे. तशीच कारवाई यानंतर केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी दिला. कामगारांनी कुणाच्याही नादाला लागू नये. चुकीची माहिती देणाऱ्यांच्या मागे जाऊन स्वत:चे नुकसान करू नये, असं सांगतानाच कामगारांनी कामावर परत यावे, असं आवाहन त्यांनी केलं. कोर्टाच्या सुनावणीनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. त्रिसदस्यी समितीने कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी अमान्य केली. या विषयावर कोर्टात दोन दिवसांपासून सुनावणी सुरू होती. समितीचा अहवाल सादर केला गेला. कोर्टातील आमचं पिटीशन मागे घेण्याची विनंती केली. काल कोर्टाने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले.