Video : मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार राडा घातला होता. अचानकपणे झालेल्या या राड्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरुनही एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला. या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते आणि एसटीच्या 115 कर्मचाऱ्यांना (ST […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार राडा घातला होता. अचानकपणे झालेल्या या राड्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरुनही एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला. या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते आणि एसटीच्या 115 कर्मचाऱ्यांना (ST Workers) मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. सध्या हे सर्व एसटी कर्मचारी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात गुणरत्न सदावर्ते हे मुख्य आरोपी तर एसटी कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आलं होतं.