मागणी रास्त पण संप बेकादेशीर; गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. पाहा...
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी सध्या संपावर आहेत. या संपावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संपकऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात. पण त्यांचा संप बेकादेशीर आहे, असं सदावर्ते म्हणाले आहेत. ज्याप्रकारे संप चालू केला आहे. त्यामुळे पन्नास टक्के कॅन्सरच्या रुग्णांची ट्रीटमेंट पुढे गेली आहे. अनेक सर्जरी कुठे गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळाले पाहिजे मिळत नाहीयेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांचे इंटरव्यू शेड्युल आहेत. परीक्षा आहेत, हे सगळं लक्षात घेता संपकऱ्यांनी लोकांना वेठीस धरू नये, असं सदावर्ते म्हणाले आहेत.
Published on: Mar 16, 2023 12:17 PM