संभाजी भिडे यांच्या सारथ्यावर राष्ट्रवादीचा सवाल? भाजपवर घणाघाती टीका

| Updated on: Jun 20, 2023 | 9:32 AM

भिडे गुरुजींनी 2022 साली वारीवरून बेताल वक्तव्य केलं होते. त्यांनी, कोरोना काळात कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे?, सवालही त्यांनी उपस्थित केला होता. मास्क लावण्याची काही गरज नाही, हा सगळा मूर्खपणा आहे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.

नाशिक : ज्ञानोबा तुकोबांची पालखी ही वारीला जात असताना पुण्यात मुक्कामी असते. यावेळी त्याचे सारथ्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी केलं. यावरून सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. कारण याच भिडे गुरुजींनी 2022 साली वारीवरून बेताल वक्तव्य केलं होते. त्यांनी, कोरोना काळात कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे?, सवालही त्यांनी उपस्थित केला होता. मास्क लावण्याची काही गरज नाही, हा सगळा मूर्खपणा आहे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन विविध स्तरांतून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे संभाजी भिडे गुरुजींनी केलं सारथ्य. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी निशाना साधला आहे. त्यांनी, भारतीय जनता पार्टी वारीत सुद्धा वैचारिक प्रदूषण करत आहे. तर राज्याला पुन्हा ज्ञानोबा तुकोबांचे विचार देण्यासाठी ‘वारी, आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणार असल्याचं म्हटलं आहे.

Published on: Jun 20, 2023 09:32 AM
Special Report | मनीषा कायंदे शिवसेनेत, अंबादास दानवे यांना धक्का? विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद कोणाकडे जाणार?
“तुमच्या राजवटीत हिंदू खतरे में असेल तर…”, सामनातून शिंदे गट आणि भाजपवर टीकास्त्र