H3N2 बाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले, माझी कळकळीची विनंती आहे
नागरिकांनी H3N2 बाबत लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे अंगावर काढू नये, अशी कळकळीचे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.
मुंबई : H3N2 Virus च्या प्रादुर्भावावर राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. राज्यात H3N2 बाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे अंगावर काढू नये, अशी कळकळीचे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले. याचबरोबर सावंत यांनी, या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. यावेळी सर्व सचिव होते. यावेली त्यांना सज्जन राहण्याबाबत सांगितले आहे. महाराष्ट्रातील पीएसई पासून जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालय यांना देखील सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. हवामानातील बदलामुले अरोग्यावर परिणाम हा दिसून येतो. त्यामुळे आपण सर्वांनी थोडं काळजी घेतली पाहिजे. गर्दी कमी करणे, थोडा डिस्टन्स मेंटेन करणे, जिथे योग्य वाटेल त्या ठिकाणी मास्क वापरणं करणे, हात धुणं आणि अंगदुखी किंवा ताप आला तर 48 तासाच्या आत वैद्यकीय सल्ला घ्या असे आवाहन त्यांनी केलं आहे.