दगडफेक करणारे शिवसैनिक असतील तर त्याचा आम्हाला अभिमान

| Updated on: Apr 24, 2022 | 11:33 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कोणीही विनाकारण घोषणाबाजी केली तर ती आम्ही सहन करणार नाही. कालही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाथ घोषणा देत होतो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कोणीही विनाकारण घोषणाबाजी केली तर ती आम्ही सहन करणार नाही. कालही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाथ घोषणा देत होतो. त्यावेळी किरीट सोमय्या त्याठिकाणी आले, गर्दी असल्यामुळ त्यांची कार हळू होती, मात्र त्यांच्या विरोधात जेव्हा घोषणाबाजी झाली त्यावेळी त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला आमच्या अंगावर गाडी चालवायला सांगितली असा आरोप एका शिवसैनिकांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी आमच्या शिवसैनिकांवर जो हल्ल्याचा आरोप केला आहे, तो खोटा असून जर त्यांच्यावर झालेला हल्ला हा शिवसैनिकानी केलेला असेल तर त्याचा शिवसैनिक म्हणून आम्हाला अभिमान आहे असं मतही हाजी हलीम यानी व्यक्त केले आहे.

Published on: Apr 24, 2022 11:31 PM
Special Report | फक्त एकमेकांचे हिशेब चुकते केले जातायत का?
मोठा अनर्थ टळला! औरंगाबाद-जळगाव महामार्गावर रस्त्यावरच बसमध्ये अग्नितांडव, थरारक घटना