Govindanand Maharaj | हनुमानाचा जन्म किंष्किंधामध्ये झाला – गोविंदानंत महाराज

| Updated on: May 30, 2022 | 8:33 PM

नाशिकमध्ये अंजनेरी पर्वत नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला, असा विश्वास अनेक भाविक व्यक्त करतात. अंजनेरी इथं हनुमानाचं एक मंदिर आहे. अंजनीपुत्र अशी ख्याती असलेल्या हनुमानाचा जन्म याच नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर झाला, असा एक युक्तिवाद केला होता. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर झालेला नाही, असं म्हणत महंत गोविंदानंद यांनी म्हटलंय. हनुमानाचा जन्म हा किष्किंधामध्येच झाल्याचा दावादेखील त्यांनी केलेला आहे.

नाशिक : अयोध्या, ज्ञानवापी, काशी यानंतर आता हनुमान जन्मस्थळाचा (Hanuman Birth place controversy) वाद पुन्हा उफाळून आलाय. हनुमानाचा जन्म अंजनेरीमध्ये झाल्याचा दावा करण्यात आला होता. यावरुन महंत गोविंदानंद (Mahant Govidanand) आक्रमक झालेत. त्यांनी थेट नाशिकच्या पुरोहित आणि अभ्यासकांना आव्हान दिलंय. नाशिकच्या अंजनेरीमध्ये हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचा पुरावा द्या, असं आव्हानं गोविंदानंद यांनी दिलंय. हनुमानाच्या जन्मस्थळावर कोणाशीही आणि कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचा दावा गोविंदानंद यांनी केला आहे. हनुमानाचा (Lord Hanuman) जन्म हा किष्किंधामध्येच झाल्याच दावा महंत गोविंदानंद यांनी केलाय. त्यावरुन चर्चेचं आव्हान देत महंत गोविंदानंद हे त्रंबकेश्वरमध्ये दाखल झालेत.

Published on: May 30, 2022 08:33 PM
Ahmednagar मधील अज्ञात व्यक्तीकडून Rupali Chakankar यांना जीवे मारण्याची धमकी-TV9
Dipali Sayyed on Amruta Fadnavis | बायकोला वाऱ्यावर सोडलं का? दिपाली सैय्यद यांचा फडणवीसांना सवाल