अमरावतीत नवनीत राणा यांच्या घरासमोर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, हनुमान चालीसाचं पठण
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जात हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर अमरावतीमधील युवासेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. रात्री 10 च्या सुमारास युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घरावर धडक देत लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली. तसंच मशिदींवरील भोंग्यांसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जात हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर अमरावतीमधील युवासेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. रात्री 10 च्या सुमारास युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घरावर धडक देत लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावली. काही वेळानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना शिवसेनेचे कार्यकर्ते असं रात्री अपरात्री येऊन हनुमान चालिसा लावणार नाहीत. दिवसा आले असते तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं, असा टोला त्यांनी लगावलाय.