100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उद्घाटनाला काका-पुतण्याने एकत्र येण टाळलं

| Updated on: Jan 06, 2024 | 2:44 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात सोडून भाजपाच्या सत्तेत सहभागी झालेले त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पुन्हा पुण्यातील अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर येणे टाळले आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पाडून अजित पवार यांनी भाजपाशी घरोबा केल्यानंतर काका-पुतण्यातील नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

पुणे | 6 जानेवारी 2023 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांनी कोणत्याही कार्यक्रमाला एकत्र येणे टाळले आहे. आज पुण्यात 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी व्यासपीठावर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत आदी पाहुणे मंडळी हजर होती. परंतू कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी येणे टाळल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी देखील अनेक कार्यक्रमांना काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार हे एकत्र येण्याची संधी असतानाही अजित पवार यांनी मात्र ऐनवेळी कार्यक्रमाला येण्याचे टाळले आहे.

Published on: Jan 06, 2024 02:43 PM
तुमच्याकडे येण्यापूर्वी ज्यांच्यावर आरोप होते ? त्यांच्यावरील कारवाईचे काय? रोहित पवार यांचा ईडी कारवाईवर भाजपाला सवाल
माझी मराठी बांधवांना हात जोडून विनंती….राज ठाकरे यांनी काय केलं आवाहन