हर्षवर्धन पाटील यांच्या लेकीनं सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ केला ट्वीट

| Updated on: Mar 23, 2024 | 7:11 PM

इंदापूरात महायुतीतील दोन घटक पक्षातच जुंपली आहे. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून आपल्याला धमक्या येत असून आपल्याला संरक्षण द्यावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. आता हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी चक्क सुप्रिया सुळे यांचा इंदापूरातील सभेचा व्हिडीओ व्हायरल करीत त्यांना पाठींबा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

इंदापूर : इंदापूरात भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यातील वाद मिठता मिठेना झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी इंदापूरात न फिरण्याची धमकी दिल्याची तक्रार इंदापूरचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी वाद मिठविण्याचे प्रयत्न देखील केले होते. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी जे आम्हाला विधानसभेत मदत करतील त्यांनाच आम्ही लोकसभेत मदत करणार अशी जाहीर भूमिका मांडली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीचा शेतकरी मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ अंकिता पाटील यांनी ट्वीट करीत दत्ता भरणे यांच्या टीका केली आहे. या व्हिडीओला अंकिता पाटील यांनी ‘जैसी करणी वैसी भरणी’ अशी कॅप्शन दिली आहे.

Published on: Mar 23, 2024 07:10 PM
Video : माझं तिकीट राज्यानं ठरवले नाही, मला पंतप्रधान मोदींनी जबाबदारी दिली, पंकजा मुंडे यांचं विधान
शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे जाणार?, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस