अनेक पक्षातील मोठे नेते बीआरएसच्या संपर्कात? काय म्हणाले हर्षवर्धन जाधव?

| Updated on: Jun 23, 2023 | 5:05 PM

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात 'बीआरएस' या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे. यासाठी 'बीआरएस'ने राज्यात मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला आहे.

औरंगाबाद: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात ‘बीआरएस‘ या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे. यासाठी ‘बीआरएस’ने राज्यात मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान नुकताच बीआरएस पक्षात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. बीआरएस या पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे धाबे दणाणले आहेत. अनेक बडे राजकीय मंडळी बीआरएसच्या संपर्कात आहेत. आपल्या पक्षाचं जहाज बुडेल असं अनेक नेत्यांना वाटत आहे, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी बीआरएस सोबत आघाडी करण्याची चाचपणी करत असल्याचा हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Jun 23, 2023 05:05 PM
“एक दिवस अजितदादा उठाव करतील”, शिवसेनेच्या नेत्याची प्रतिक्रिया
“संजय राऊत यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी”, शिवसेनेचा खोचक सल्ला