2019 साली काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश का केला? हर्षवर्धन पाटील यांनी एका वाक्यात कारण सांगितलं…
Why Harshwardhan Patil Join BJP : काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश का केला? याचं नेमकं कारण काय? ते हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे सांगितलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा व्हीडिओ...
इंदापूर, पुणे : हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या निवडणुकीआधी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाची खूप चर्चा झाली. काँग्रेसमध्ये प्रस्थ असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची वाट का धरली?, असा अनेकांना प्रश्न पडला. त्याचं उत्तर हर्षवर्धन पाटलांनी दिलं आहे. एका वाक्यात त्यांनी कारण सांगितलं आहे. “काँग्रेस पक्षात माझ्यावर सातत्याने अन्याय होत होता. म्हणून चार वर्षांपूर्वी काँग्रेस पक्ष सोडला, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. मागच्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्या विरोधात एकही चौकशी सुरू नाहीये. माझ्यावर अन्याय झाला. मी स्वाभिमानी होतो, म्हणून भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात गेलोय, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
Published on: Mar 27, 2023 12:36 PM