‘वादग्रस्त विधानं करूनही भिडे यांना अभय?’ जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले, कसली भीती सरकारला वाटतेयं?

| Updated on: Jun 28, 2023 | 9:49 AM

संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्यदिन आणि तिंरग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते, आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे प्रवक्ते, नेते राजू वाघमारे यांनी टीका केली आहे. याचमुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड देखील संतापले.

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आताही संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्यदिन आणि तिंरग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते, आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे प्रवक्ते, नेते राजू वाघमारे यांनी टीका केली आहे. याचमुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड देखील संतापले. त्यांनी संभाजी भिडेंनी तिरंग्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावरून आव्हाड यांनी भिडेंचा समाचार घेतला. तसेच देशाच्या स्वातंत्र्याबद्दल अत्यंत शेलक्या शब्दात जर कोणी बोललं असतं तर आता पर्यंत सरकारनं त्याच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून आत टाकलं असतं. पण हे सरकार का गुन्हा दाखल करत नाही असा सवाल केला आहे. तर भिडेंना काय कर्णाने दान केलेलं कर्ण कवच सापडलं आहे का? असा सवाल देखील त्यांनी करताना हे सरकार कोणाला घाबरतय असा सवाल केला आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे काही मागच्या वेळेस झालं, जे बळी पडली त्याचं गुपीत बाहेर पडेल म्हणून भिडेंकडे दुर्लक्ष केलं जात आहे का असही सवाल त्यांनी केला आहे.

Published on: Jun 28, 2023 09:49 AM
Special Report | दावे-प्रतिदावे, डिवचलं-सुनावलं; जळगावात एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस भिडले!
“तुम्हीही मालक बदलला, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादांसोबत…” एकनाथ खडसे यांचा फडणवीस यांना पलटवार